मलेशिया ओपनमध्ये भारताची स्टार जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शानदार विजयासह उपांत्य फेरी गाठली. या सुपर 1000 स्पर्धेत सातव्या मानांकित भारतीय जोडीने मलेशियाच्या यू सिन ओंग आणि ई यी तिउ यांचा 26-24, 21-15 असा पराभव केला. गेल्या वेळी उपविजेते ठरलेले सात्विक आणि चिराग यांचा सामना दक्षिण कोरियाच्या वोन हो किम आणि सेउंग जे स्यू यांच्याशी होईल.