मिळालेल्या माहितीनुसार, मुलासाठी मुलगी पसंत झाली आणि दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. दोन्ही घरात लग्नाची तयारी सुरु झाली. मात्र मुलगी आणि मुलाचे वडील कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे कळलेच नाही. दोघांनी लग्न केल्यावर वडिलांनी स्वतःची पत्नी आणि मुलाच्या सावत्र आईच्या रूपात मुलीला घरात आणले. या लग्नामुळे सगळ्यांना धक्काच बसला.
हा प्रकार घडल्यावर मुलाने संसारातून विरक्ती घेत संन्यासी होण्याचा निर्णय घेतला. त्याला सगळ्यांनी समजावले मात्र त्याने कोणाचे ऐकण्यास नकार दिला. मुलासाठी वडिलांनी दुसरी मुलगी शोधण्यास सुरुवात केली असून देखील त्याने लग्न न करण्याचे स्पष्ट केले. मुलाने संन्यासी जीवन अवलंबवून घर सोडले असून तो रस्त्यावर राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.