Petrol-Diesel Prices Today: पेट्रोल आणि डिझेलच्या आजच्या किमतीं जाणून घ्या

रविवार, 9 जुलै 2023 (11:08 IST)
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 78 डॉलरच्या पुढे गेले आहे.  मात्र, भारतीय बाजारपेठेत राष्ट्रीय पातळीवर पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. 
 
आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 78.47 डॉलर आहे. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 73.86 आहे.  देशातील अनेक भागांमध्ये, पेट्रोलच्या दराने प्रति लिटर 100 रुपये ओलांडले आहेत, तर डिझेलची किंमत देखील प्रति लिटर 90 रुपयांपेक्षा जास्त आहे. 
 
आज (रविवार) 9 जुलै रोजीही दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.  
 
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात 


Edited by - Priya Dixit   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती