हुश्श, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात घसरण

बुधवार, 30 मे 2018 (09:42 IST)
तब्बल १६ दिवसानंतर पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत काही प्रमाणात घसरण झाली आहे. पेट्रोलच्या किंमतीत ६० पैसे प्रति लिटर तर डिझेलच्या किंमतीत ५६ पैसे प्रति लिटरची कपात करण्यात आली आहे. बुधवारी दिल्लीत पेट्रोल ७७ रूपये ८३ पैसे प्रति लिटर तर डिझेल ६८ रूपये ७५ पैसे असा दर आहे. या दरकपातीमुळे देशातील कोट्यवधी जनतेला अल्पसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान मंगळवारी लखनऊ येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी डॉलर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे स्पष्ट केले होते. आता केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनाच्या किंमती कमी करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. 

 

 देशभरातील प्रमुख शहरात पेट्रोलचे दर असे
दिल्ली-७७.८३
मुंबई- ८५.६५
कोलकाता-८०.४७
चेन्नई-८०.८०

डिझेल
दिल्‍ली – ६८.७५
मुंबई- ७३.२०
कोलकता – ७१.३०
चेन्‍नई – ७२.५८

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती