चीनची कंपनी ओप्पो, विवो, रियलमीचे भारतातील मॅन्यूफॅक्चरींग प्लांट बंद

बुधवार, 25 मार्च 2020 (12:00 IST)
चीनहून संपूर्ण देशात पसरलेल्या करोना व्हायरस संसर्गाची झळ कमी होताना दिसत नाहीये. दिवसेंदिवस व्हायरसचा धोका वाढत चालला आहे. या संदर्भात चीनची ओप्पो, विवो आणि रियलमी कंपनीने भारतातील ग्रेटर नोएडा येथील मॅन्यूफॅक्चरींग प्लांट तात्पुरता बंद केला आहे. 
 
रियलमीने पुढील सूचना येईपर्यंत आपला कारखान्यातील कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी कंपनीने लॉकडाऊन ध्यानात ठेवून आपले एमआय होम्स पुढील सूचना मिळे पर्यंत बंद केले होते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
 
करोना व्हायरसमुळे जगभरातील उद्योग क्षेत्राला जबर फटका बसला आहे. ऑटो क्षेत्रापासून ते मोबाइल क्षेत्र तर ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने देखील आपली सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती