पहिल्यांदा कांदा निर्यातीचा ऐतिहासिक विक्रम

यंदा कांदा निर्यातीतून सरकारला ४६५१ करोड रुपयांचे परकीय चलन मिळालेले आहे. देशातील कांदा निर्यातीमध्ये पहिल्यांदा ३४ लाख ९२ हजार टनांचा निर्यातीचा ऐतिहासिक असा विक्रम झालेला आहे.

नाशिक जिल्ह्यातून प्रथमतः एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात झालेली आहे. मागील सात वर्षांनंतर कांद्याचा नवा विक्रमी विक्रम मोडला गेला आहे. सरकारने कांद्याचे किमान निर्यात मुल्य हटविल्यामुळे कांदा निर्यातीवरील बंधने आपोआपच कमी झाल्याचा आंतराष्ट्रीय पातळीवर सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे दिसून येत आहे. यामुळे यंदा कांद्याची निर्यात मागील वर्षीच्या तुलनेत तबळ तिपटीने वाढली आहे. परिणामी यामुळे देशाला परकीय चलन मिळण्यास हातभार लागला असल्याचे नाफेड संचालक नानासाहेब पाटील यांनी  सांगितले आहे.

वेबदुनिया वर वाचा