Oil prices rise सणासुदीला तेलाच्या किमतीत वाढ

शनिवार, 22 ऑक्टोबर 2022 (19:07 IST)
सणासुदीला तेलाच्या किमतीत वाढ ऐन सणासुदीला खाद्यतेल माहागले, सोयाबीन तेलाच्या मागणीत अचानक वाढ, दिवाळी आली असतानाच खाद्यतेलाचे दर आठवडाभरात सरासरी 18 रुपयांनी वाढले आहेत, केंद्रा सरकारने मागील काही महिन्यांत आयात शुल्कात मोठी कपात केल्यानंतरही दरवाढ झाली आहे, सर्वाधिक मागणीच्या मामतेलापेक्षा सोयाबीन तेलाची मागणी बाजारात अचानक वाढलेली दिसून येत आहे.
 
किरकोळ किमतींवर दबाव कायम आहे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत सरकार सूर्यफूल तेलाच्या आयातीवरील 2 दशलक्ष टन कोटा मर्यादा हटवत नाही, तोपर्यंत या तेलाचा पुरवठा कमी राहील आणि त्याचे भाव चढेच राहतील. सरकारच्या या निर्णयामुळे महसुलाचे नुकसान होत असल्याचे ते म्हणाले. तसेच, सूर्यफूल तेलासाठी ग्राहकांना प्रतिलिटर 20 ते 30 रुपये अधिक मोजावे लागतात. सरकारने सूर्यफूल आणि सोयाबीन डेगमची आयात मर्यादा रद्द करावी किंवा पूर्वीप्रमाणेच शुल्क आकारावे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती