New Bank Locker Rules:आजच्या डिजिटल युगात, लोकांना कमी रोख ठेवण्याची सवय लागली आहे, ते ऑनलाइन पेमेंट करण्यास प्राधान्य देत आहेत. या सर्व सुविधा देण्यात बँकेचा मोठा वाटा आहे.प्रत्येकाची बँक वेगवेगळी असते पण सर्व बँकांचे नियम आरबीआय ठरवते.
आरबीआयच्या नवीन बँक लॉकर नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत, ज्यात नवीन नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने बँक लॉकरमध्ये आपले सामान ठेवले आणि ते खराब झाले तर त्याचे नुकसान भरण्याची जबाबदारी बँकेची असेल.
ही तुमच्या जवळची कोणतीही शाखा असू शकते आणि त्यानंतर तुम्हाला तेथे अर्ज सबमिट करावा लागेल. तुम्हाला प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर लॉकरचे वाटप केले जाते. अर्ज केल्यानंतर तुमचे नाव बँकेच्या प्रतीक्षा यादीत दिसल्यास, तुम्हाला लॉकर दिले जाणार.या साठी तुम्हाला वार्षिक तत्त्वावर भाडे द्यावे लागणार.