Moradabad : बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले 18 लाख रुपये वाळवीने खालले

बुधवार, 27 सप्टेंबर 2023 (16:15 IST)
घरात वाळवी लागली तर संपूर्ण घर पोखरून टाकते. सहसा लाकडाच्या दारात वाळवी लागते. पण मुरादाबाद येथे बँक ऑफ बडोदाच्या आशियाना शाखेत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या 18 लाख रुपयांच्या नोटा दीमकने खालल्या. सोमवारी जेव्हा महिला खातेदाराने लॉकर उघडले तेव्हा चलनी नोटांचे तुकडे दीमकाने खाललेले दिसले तेव्हा तिला धक्काच बसला. तिने तातडीनं शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार केली. बँकेच्या शाखा व्यवस्थापनाने याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. 

ही महिला मुलांना शिकवण्याचे काम करते. त्यांचे अनेक वर्षांपासून बँक ऑफ बडोदामध्ये लॉकर आहे. तिने ऑक्टोबर2022 मध्ये एका प्लास्टिकच्या काळ्या पिशवीत दागिन्यांसह 18 लाख रुपये ठेवले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना बँकेकडून लॉकरच्या नूतनीकरणाच्या करारासाठी केवायसी करण्यासाठीचे पत्र आले होते. या साठी त्या बँकेत गेल्या आणि त्यांनी लॉकर उघडून पहिले तर प्लॅस्टिकच्या काळ्या पिशवीत ठेवलेल्या सर्व नोटांना वाळवी लागली असून नोटांचे काहीच तुकडे शिल्कक होते. महिलेने आपल्या मुलीच्या लग्नासाठी हे पैसे जमवून लॉकर  मध्ये ठेवले होते.

त्यांनी तातडीनं व्यवस्थापकांकडे तक्रार केली. महिलेच्या तक्रारीनंतर शाखा व्यवस्थापक आणि इतर कर्मचारी लॉकर रूममध्ये पोहोचले. दुसरीकडे माहिती मिळताच पोलीसही पोहोचले. त्यांनी बँकेचे लॉकर पाहिले, तेथे लॉकरच्या बाहेर जमिनीवर दीमकाने नष्ट केलेली पैशांची पिशवी पडली होती.  महिलांनी सांगितले की, इतर दोन ग्राहक आले तेव्हा त्यांच्या लॉकरमध्येही वाळवी लागलेली आढळून आले.दीमक व इतर कीटकांपासून बचाव करण्यासाठी बँकेत नियमित उपाययोजना केल्या जातात. लॉकरमध्ये दीमक कशी पोहोचली याचा तपास सुरू आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती