एसटी संपकऱ्याचा 36 दिवसांचा पगार कापणार

एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांचा तब्बल 36 दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने संपकरी कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार आहे.  या महिन्यातील चार दिवसाचा पगार कापला जाईल, तर उरलेल्या 32 दिवसांचा पगार पुढील सहा महिन्यात कापण्यात येईल.
 
चार दिवस पुकारलेला संप आणि त्यामुळे झालेल्या नुकसानभरपाई बाबत नियमानुसार एका दिवसामागे आठ दिवस असा 36 दिवसांचा पगार कापला जाणार आहे. ही पगार कपात अन्यायकारक असल्याचं सांगत मान्यताप्राप्त एस टी कर्मचारी संघटना मुंबई औद्योगिक न्यायालयाकडे दाद मागणार आहे.
 
ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी चार दिवस संप पुकारला होता. मुंबई उच्च न्यायालयाने संप बेकायदा ठरवल्यानंतर, एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती