महिंद्राची मोठी गुंतवणूक करणार मेक इन इंडिया

जगभरातील अनेक कार उत्पादक कंपन्यांना आपल्या महिंद्रा आणि महिंद्रा ने मोठा आवाहन निर्माण केले आहे. तेच पुढे नेत आता टोयाटा आणि इतर मोठ्या कंपन्यांना टक्कर देण्या करिता महिंद्रा सज्ज झाली आहे. यामध्ये ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाअंतर्गत राज्याच्या उद्योग वाढीला चालना देणारी मोठी गुंतवणूक कंपनी महाराष्ट्रात करणार आहे. नाशिक व इगतपुरी येथील प्रकल्पांचा विस्तार करणार आहे.
 
यामध्ये १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.या ठिकाणाहून U321 या बहुपयोगी (एमपीव्ही) वाहनाची निर्मिती होणार आहे. त्याचे ब्रँडनेम अजून जाहीर झाले नसले तरी देशातील इतर ठिकाणी या वाहनाच्या चाचण्या सुरू झाल्या असून भारतीय बाजारपेठेत हे वाहन या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहित दाखला होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.या वाहनाचे इंजिन कंपनीच्या इगतपुरी येथील प्रकल्पात तयार होणार असून त्याचे नाशिकच्या प्रकल्पात होणार आहे.त्यामुळे आपल्या राज्याला मोठा फायदा होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा