खाद्यतेलाला महागाईची फोडणी, दर वाढण्याची शक्यता

मंगळवार, 29 मार्च 2022 (11:55 IST)
रशिया- युक्रेन युद्धाचा परिणाम अवघ्या जगावर पडत आहे. खाद्य तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. सूर्यफूल, मोहरी, वनस्पती, भुईमुगाच्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून तज्ज्ञाच्या मते या किमतीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. सूर्यफुलाचा  तेलाचा पुरवठा रशिया आणि युक्रेन मधून होतो. 
 
भारतात पेकेज्ड सूर्यफुलाच्या तेलाच्या किमतीत फेब्रुवारी मध्ये 4 टक्के वाढ झाली. तर मोहरीचे तेल 8.7 टक्क्याने वाढले. वनस्पतीच्या किमतीत 2.7 टक्के वाढ झाली तर सोयाबीन तेलाच्या किमतीत किरकोळ घट झाली. पाम तेलाच्या किमती वधारल्या होत्या आता 12.9 टक्के कमी झाल्या आहे. 
 
 रिटेल इंटेलिजन्स बिझोमच्या म्हणण्यानुसार, रशिया -युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात खाद्य तेलाच्या किमतीत वाढ झाली होती. खाद्यतेलाच्या किमतीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती