यंदा त्यांनी 35 क्विंटल साखरेचा हार बनवला आहे. त्याची सध्या 100 ते 110 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. याठिकाणी बनवलेल्या माळा पंढरपूर शहर व तालुक्यात विकल्या जातात. दरम्यान, गुजरातमधून येणाऱ्या उसाचे भाव 15 ते 20 टक्क्यांनी खाली आले आहेत. त्यामुळे बाजारात या हारांची मागणी वाढली आहे. स्थानिक व्यवसायावरही याचा परिणाम झाल्याचे दिसत आहे.