मंदीची समस्या गंभीर आहे, हे सरकारनं मान्य करायला हवं - रघुराम राजन

Webdunia
शनिवार, 7 डिसेंबर 2019 (10:45 IST)
भारतात मंदीची समस्या गंभीर असल्याचं सरकारनं मान्य करायला हवं, असं रघुराम राजन यांनी म्हटलंय. राज्य सरकारांना दोष देण्याऐवजी यातून केंद्रानं मार्ग काढायला हवा, असंही राघुराम राजन म्हणाले.
 
रघुराम राजन यांनी सत्तेचं अति-केंद्रीकरण आणि पंतप्रधान कार्यालयाकडून ठेवण्यात येत असलेल्या नियंत्रणाबाबतही आक्षेप नोंदवला. पंतप्रधान कार्यालयात अधिकारांचं केंद्रीकरण झाल्यान इतर मंत्र्यांना काम करण्यात अडचणी येत असल्याचं राजन म्हणाले.

संबंधित माहिती

पुढील लेख