Gold Price Today: एका महिन्याच्या रेकॉर्ड किमतीने सोने घसरले, जाणून घ्या आज किंमती किती खाली आल्या?

गुरूवार, 8 एप्रिल 2021 (14:29 IST)
एका दिवसाच्या तेजीनंतर आज पुन्हा किंमती खाली आल्या आहेत. MCXवरील सोन्याचा (Gold Price Today) 0.1 टक्क्यांनी घसरला म्हणजेच 96 रुपयांनी घसरून 46,320 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. त्याचबरोबर चांदीचा वायदा (Silver Price Today) 0.34 टक्क्यांनी घसरून म्हणजे 228 रुपये घसरून 66,405 प्रतिकिलो राहिला. मागील सत्रात सोन्याच्या किमतीत 0.9 टक्क्यांनी वाढ झाली होती. त्याच वेळी चांदी 1.1 टक्क्यांनी वधारली. याशिवाय रुपयामध्ये मोठी घसरण झाली.
 
8 एप्रिल 2021 रोजी सर्व महानगरांमध्ये सोन्याची किंमत वेगळी आहे. देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 48,880 रुपये प्रति 20 ग्रॅम आहे. त्याशिवाय चेन्नईमध्ये 47,280 रुपये, मुंबईत 45,350 रुपये आणि कोलकातामध्ये प्रति 10 ग्रॅम 47,80 रुपये पातळीवर ट्रेड करत आहे.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती