"राज्याचं राजकारण कुठं चाललंय हे पाहून मलाच आता कळायचं बंद झालंय. राज्यात सुरू असलेलं राजकारण हा करमणुकीचा भाग आहे," असं मत खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केलं आहे. लोकसत्ताने उदयनराजे यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादाची बातमी प्रसिद्ध केली आहे.
"राज्य सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री आणि मंत्री यांनासुद्धा जनतेची काळजी आहे. त्यांनाही कुटुंब, कार्यकर्ते, मतदार यांची काळजी आहे. त्यामुळे ते कोणताही निर्णय बेजबाबदारपणे चुकीचा घेणार नाहीत. मात्र, आरोग्य महत्त्वाचे आहेच पण खाण्याचे काय? याचाही विचार सरकारने करावा. त्यामुळे सरकारने लोकहिताचे निर्णय घ्यावेत.
"जगाच्या पोटात या संसर्गाने भीतीचा गोळा निर्माण केला. या आजाराच्या नुसत्या भितीने लाखो लोक हृदयविकाराने गेले. त्यामुळे लोकांनी न घाबरता संसर्गाचा सामना करावा," असं उदयनराजे यांनी मत मांडल्याचं या बातमीत म्हटलं आहे.