सोन्याचे दर पडले तोळा 30 हजार

शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (17:03 IST)
500 आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर सोन्याचा दर चांगलाच वधारला होता.तर काही ठिकाणी सोनारांनी काहीही दर आकारून सोने विकले होते.त्यामुळे अनेक तक्रारी सरकारकडे दाखल झाल्या होत्या. मात्र केंद्र सरकारने तंबी दिल्यावर मात्र आता  त्सोन्याच्या दरात घसरण होऊन प्रतितोळा 30 हजार रुपये दर गेला.
 
गेल्या दोन-तीन दिवसांपासून व्यापारी चांगलेच तेजीत आहेत. काही सोने व्यापाऱयांकडून वाढीव दर सांगून ग्राहकांची लूट केली.  जळगावमध्ये दोन दिवसांपूर्वी सोन्याचा भाव 33 हजारापर्यंत गेला होता. मात्र, आता हा दर 30 हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 

वेबदुनिया वर वाचा