खिशाला कात्री, गोकुळ दुधाच्या दरातही वाढ

शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (11:47 IST)
गोकुळ दूध संघाने शुक्रवारी दुधाच्या दरात वाढ केली आहे. कंपनीने म्हैस व गाय दूध दर संघात प्रतिलिटर दोन रुपयाची वाढ केली आहे. 
 
दूध दरामध्ये पुन्हा एकदा दरवाढ झाल्याने मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथील ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. राज्यातील सर्वात मोठ्या सहकारी गोकुळ दूध संघाने गेल्या महिन्यामध्येच गाय दूध विक्रीमध्ये दोन रुपयाची वाढ केली होती. आता पुन्हा एकदा वाढ केल्याने ग्राहकांना महागाईचा चांगलाच फटका बसला आहे.
 
म्हैस दूध दर प्रति लिटर 69 रुपये होतं ज्यात आणखी दोन रुपयाची वाढ करण्यात आली आहे. गाय दूध विक्री दर 54 रुपये वरून आता 56 रुपये झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती