कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आता सर्व सामान्य माणसाला महागाईचा आणखी फटका बसणार आहे. इंधन दरवाढीमुळे कच्च्या मालाची किंमत वाढल्याने कपडे, उपकरणे, खाद्य पदार्थ , सौंदर्य प्रसाधनासह दैनंदिन वापरण्याच्या वस्तू महागणार आहे. दैनंदिन वापरण्याच्या वस्तूंच्या किमतीत 8 ते 10 टक्क्याने वाढ होणार त्यामुळे कापड उद्योगाला मोठा फटका बसणार. गेल्या काही महिन्यापासून डिझेलच्या दारात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पुरवठा साखळीवर त्याचा परिणाम झाला आहे. आता कपडे, फ्रिज, किराणा, पॅकबंद वस्तू, सौंदर्य प्रसाधने महागणार आहे. इंधन दरवाढीमुळे लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंग खर्च वाढले आहे. त्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची भाडे वाढली आहे. त्यामुळे या वस्तूंच्या किमतीत वाढ होण्याचे कंपन्यांनी सांगितले.