राज्यात सध्या दुधाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दुधाचे दर हे 34 रुपयांवरुन 27 रुपयांवर आले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळं ठिकठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत. तसेच शासनाच्या आदेशाची राज्यभर होळी देखील करत आहेत. आज राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये दूध संकलन केंद्रांवर शासनाच्या 34 रुपये दर देण्याच्या आदेशाची होळी करण्यात आली.
दरम्यान, राज्य सरकारच्या दुध दर समीतीने दुधाला 34 रूपये दर देण्याचा आदेश काढूनही दुधसंघ दर देत नसल्याने आज राज्यभर सरकारच्या आदेशाची होळी केली जातेय.. दुधाला 34 रुपये दर द्यावा यासाठी सरकारच्या दूध दर समितीने शासन आदेश काढला होता. मात्र, हा शासन आदेश राज्यातील दूध संघ आणि दुध कंपन्यांनी धुडकवला आहे.