दर वाढीमुळे सर्वसामान्यांना कांदा रडवणार

Webdunia
रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (13:49 IST)
यंदा अवकाळी पावसाचा फटका शेतकरी बांधवाना बसला आहे. यंदा अवकाळी पावसामुळे कांद्याला मोठा फटका बसला आहे. पावसामुळे 50 टक्के कांदा खराब झाला आहे. बाजारात जरी कांद्याची आवक चांगली झाली असली तरी ही यंदा दरवाढीमुळे सर्वसामान्यांना कांदा रडवणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. 
 
सध्या बाजारात नवीन कांदा आला आहे. पावसामुळे कांदा खराब झाल्यामुळे घाऊक बाजारात कांद्याचे भाव 20 -30 रुपये प्रतिकिलो आहे. तर किरकोळ बाजारात कांद्याचे भाव 40-50 रुपये किलो आहे. आणि या दराने विकला जात आहे. त्या मुळे अवकाळी पावसामुळे तोडणीला आलेला कांदा खराब झाल्यामुळे कांद्याचे दर वाढत राहणार अशी शक्यता व्यापारी वर्ग वर्तवत आहे. कांद्याचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्याला कांदा रडवणार असल्याचे दिसत आहे.   
 

संबंधित माहिती

पुढील लेख