खुशखबर! धनत्रयोदशीपूर्वी सोन्याच्या भावात घसरण, चांदीही झाली स्वस्त, काय आहे भाव?

शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (14:06 IST)
सध्या सणासुदीचे दिवस असून आजपासून दिवाळी अर्थात दीपावलीची सुरुवात झाली आहे.वसुबारसेपासून घरोघरी पहिला दिवा लावला जातो. तर उद्या देशभर धनत्रयोदशी म्हणजे धनतेरसचा सण साजरा केला जाईल. दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त साधून अनेक लोक मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीची खरेदी करतात. तर गुंतवणूकीच्या दृष्टीने देखील सोने-चांदीची खरेदी करण्याला पसंती दिली जाते.
 
अशातच धनत्रयोदशीपूर्वी ग्राहकांना खरेदीची संधी चालून आली आहे, कारण धनत्रयोदशी-दिवाळीच्या आठवड्यात सलग तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव कमी झाला आहे.
 
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या आसपास अनेकदा सोन्याच्या भावात वाढ दिसून येते, परंतु यावेळी हा कल कमी दिसतो. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव अंदाजे 61,190 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 56,090 रुपये आहे. याव्यतिरिक्त, चांदीचा सध्याचा भाव 73,500 रुपये प्रति किलोग्राम आहे.
 
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
चेन्नई- 61,7400 रुपये
 
कोलकत्ता - 61,190 रुपये
 
दिल्ली - 61,340 रुपये
 
मुंबई - 61,190 रुपये
 
पुणे - 61,190 रुपये
 
पटना - 61,240 रुपये
 
सोन्याची शुद्धता कशी ओळखायची:
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.
 
बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
 
हॉलमार्क
सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.
 
 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती