1910 साली विश्वनाथ पर्शराम बेडेकर यांनी गिरगावात लहानसं किराणामालाचं दुकान सुरू केलं. त्याच दुकानात त्यांनी मसाले आणि लोणची ठेवण्यास सुरूवात केली. मसाले लोणची यांचा खप भरपूर व्हायला लागल्यावर दुकानांच्या शाखा काढायला सुरूवात केली. मुगभाट, दादर, फोर्टमध्ये माणकेश्वर मंदिराजवळ बेडेकरांची अल्पावधीतच पाच दुकाने झाली. पुढे धंद्याचा व्याप वाढता राहिल्यावर 1943 मध्येच व्ही. पी. बेडेकर आणि सन्स लिमिटेड असं कंपनीचं नामकरण करण्यात आले. कालांतराने हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आणि बेडेकर मसाले हा एक मोठा ब्रँड तयार झाला.
पुढे धंद्याचा व्याप वाढता राहिल्यावर1943 मध्येच व्ही. पी. बेडेकर आणि सन्स लिमिटेडअसं कंपनीचं नामकरण करण्यात आलं. 123 वर्षांची परंपरा जपणारी ही त्यांची चौथी पिढी आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये विक्री होते. त्याचबरोबर सातासमुद्रापलीकडे बेडेकर नाव पोहचले आहे. अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि पूर्वेकडील देशांमध्ये देखील निर्यात होते.