Diwali Royal Bonus दिवाळीचा दिला रॉयल बोनस

शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (10:17 IST)
PTI
Diwali Royal Bonus दिवाळीला आता अवघे काही दिवस उरले असून देशभरात सणाचा उत्साह स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान, कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची परंपरा सुरू केली आहे. अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना सणासुदीसाठी बोनस, मिठाई, कपडे आदी भेटवस्तू देत आहेत. दरम्यान, काही कंपन्या अशा आहेत ज्या आपल्या कर्मचाऱ्यांना अशा भेटवस्तू देत आहेत ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. निलगिरी जिल्ह्यातील कोटागिरी शहरातील एका चहाच्या बागेने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचे सरप्राईज म्हणून रॉयल एनफिल्ड बाइक्स भेट दिल्या आहेत. कंपनीकडून रॉयल एनफिल्ड बाईक मिळाल्याने कर्मचाऱ्यांना खूप आनंद झाला.

VIDEO | With only 10 days left until Diwali, companies have initiated the tradition of offering bonuses to their employees. Many firms are providing incentives, sweets, fireworks, and clothing to their staff to celebrate the festive season.

However, a tea estate in Kotagiri… pic.twitter.com/J8uPGmczn9

— Press Trust of India (@PTI_News) November 2, 2023

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती