खासदार धैर्यशील माने हरवले ? पेठवडगावात सकल मराठाचे अनोखे आंदोलन

गुरूवार, 2 नोव्हेंबर 2023 (21:58 IST)
हातकणंगले मतदार संघातील पेठवडगावात आज एक अनोखे आंदोलन पहायला मिळाले. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हे गेल्या काही दिवसांपासून हरवले असून त्यांनी मराठा समाजाची मते घेऊन समाजाची फसवणूक केली असल्याचा मजकूर असलेला डिजीटल बोर्ड पेठवडगाव शहरात लावल्याने एकच चर्चा घडून आली आहे. त्यामुळे खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात केले गेलेल्या आंदोलनाने लक्ष वेधून घेतले आहे.
 
वर्ण गोरा…वाढलेली दाढी असे वर्णन लिहून मराठा समाजाची मते घेऊन समाजाची फसवणूक केली. खासदार कोणाला आढळल्यास लवकरात लवकर मतदारसंघात त्यांची पाठवणी करा….आंदोलक एवढ्यावरच न थांबता त्यांनी लवकरात लवकर परत या तुम्हाला कोणी रागावणार नाही असेही आंदोलकांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज- जरांगे यांनी गेल्या अनेक दिवसांतून आंदोलन सुरु केले आहे. मराठा समाजाच्या या मागणीला लोकप्रतिनिधी म्हणून तसेच मराठा समाजाचा एक नेता म्हणून खासदार धैर्यशील माने यांनी कोणतीच भुमिका घेतली नाही. तसेच जिल्हाभर चाललेल्या या आरक्षणाच्या लढ्यात ते कोठेच दिसले नाहीत. त्यामुळे खासदार हरवले आहेत कि काय अशी शंका येऊ लागली आहे. अशा प्रतिक्रिया सकल मराठा समाजाच्य़ा कार्यकर्त्यांनी दिल्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती