चंदा कोचर चौकशीसाठी अनुपस्थित : ईडीचा आरोप

मंगळवार, 11 जून 2019 (10:22 IST)
आयसीआयसीआय बॅंकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना मनि लॉंड्रिंगच्या प्रकरणात ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्य बजावले होते. पण प्रकृती अस्वास्थ्यतेचे कारण देत ते या चौकशीला अनुपस्थित राहिल्या. त्यामुळे त्यांना पुन्हा समन्स बजावले जाणार आहे. गेल्या आठवड्यातही त्या या चौकशीला उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. त्यावेळीही त्यांनी प्रकृतीचेच कारण दिले होते.
 
चंदा कोचर यांची या प्रकरणात आधी चौकशी झाली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आयसीआयसीआय बॅंकेच्या अन्यही काहीं अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण करण्याचा इरादा ईडीने व्यक्‍त केला आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे चंदा कोचर यांच्यावर पुढील कारवाईचे स्वरूप ठरवले जाणार आहे. व्हिडीओकॉन उद्योग समुहाचे अध्यक्ष धूत यांच्याशी हातमिळवणी करून चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ईडीचा आरोप आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती