राफेल चौकशीला का घाबरता - शिवसेना

गुरूवार, 3 जानेवारी 2019 (09:19 IST)
राफेल विषय भाजपा साठी डोकेदुखी ठरली आहे. रोज नवे आरोप विरोधक करत आहेत. त्यामुळे सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनं देखील भाजपला लक्ष्य केलं आहे. लोकसभेत राफेल करारावरून शिवसेनेनं सरकार जेपीसी चौकशीला का सामोरं जात नाही? असा थेट प्रश्न शिवसेना विचारत आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. भारतीय कंपनी HALया चांगली काम करत आहे. एचएएल ही सरकारी कंपनी राफेल विमाने भारतात बनवू शकते असे एचएएलच्या माजी सीएमडीनी स्पष्ट केले. तर मग, एचएएलला कंत्राट का देण्यात आले नाही? असा सवाल शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी पुढे केला आहे. यामध्ये ३६ राफेल विमाने २०२० साली भारताला मिळणार आहेत. राफेल अद्ययावत अशी विमानं आहे. मग, त्यानंतर देखील आपण त्यांची संख्या का कमी केली? जेपीसी चौकशी करू नये असे सर्वोच्च न्यायालयानं निकालामध्ये कुठेही म्हटलेलं नाही. त्यानंतर देखील सरकार जेपीसी चौकशीला का सामोरं जात नाही? असा सवाल अरविंद सावंत यांनी सरकारला केला आहे. मित्रपक्षाच्या या प्रश्नामुळे भाजपची अडचण झाली. 
 
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट चर्चेचं आव्हान दिलं आहे. पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांनी राफेल करारवर माझ्याशी २० मिनिटं चर्चा करावी असं थेट आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं आहे. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची एक व्हिडीओ क्लिप देखील दाखवली. ज्यामध्ये अरूण जेटली राफेल विमानाची किंमत १६०० कोटी असल्याचं सांगत आहेत. यामुळे आता विरोधक भाजपला कोंडीत पकडता यावे म्हणून जोरदार प्रयत्न करत आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती