'फेसबुक'ने घेतले 'फेस डॉटकॉम'चे अधिकार विकत!

वेबदुनिया

बुधवार, 20 जून 2012 (13:00 IST)
WD
फेसबुकने आता 'फेस डॉटकॉम' या साईटच्या कंपनीचे अधिकार विकत घेतले असून, या नवीन सॉफ्टवेअर डेव्हलपिंग कंपनीच्या साह्याने 'क्लिक' हे अप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे आता संगणकावरील डिजिटल फोटोंनाही फेस रेकग्निशन मिळणार आहे. फेसबुकवर कोणताही फोटो अपलोड केल्यास तो आपोआप 'टॅग' केला जाईल.

त्याचप्रमाणे कमी प्रकाशातील अथवा खराब झालेला जुना असला, तरी असे फोटोही सहज या अप्लिकेशनमुळे ओळखला जाईल व टॅगही होईल. फेस डॉटकॉम या कंपनीने नुकत्याच आपल्या ब्लॉगवर दिलेल्या माहितीनुसार मोबाईल किंवा डिजिटल कॅमेर्‍यातही या प्रकारची अप्लिकेशन्स वापरता येईल.

वेबदुनिया वर वाचा