पेट्रोल, डिझेलच्या दरात तीन रुपयांनी वाढ

रविवार, 1 मार्च 2015 (18:21 IST)
सार्वजनिक क्षेत्रातील तेल उत्पादक कंपन्यांनी शनिवारी इंधनाच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात 3.18 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 3.09 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. हे दर शनिवारच्या 
मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.
 
‘आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या   विनिमय दरातही घसरण झाली आहे. या दोन्ही बाबींचा एकत्रित परिणाम म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीदरात वाढ करण्यात आली आहे’ असे भारतीय इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्यावतीने कळविण्यात आले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने पहिलावहिला अर्थसंकल्प सादर केल्यावर देशभर समाधान व्यक्त केले जात होते. मात्र अर्थसंकल्पानंतर काही तासातच इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. अलीकडेच इंधनाच्या दरात करण्यात आलेली ही दुसरी वाढ आहे.

वेबदुनिया वर वाचा