नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र

सोमवार, 20 मे 2024 (13:05 IST)
लिक्विड नाइट्रोजन पान खाणे सर्वानाच आवडते. तसेच लहान्यांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना हे पान खाणे आवडते. हेच नाइट्रोजन पान खाल्ल्यामुळे एका 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात छिद्र झाले आहे.

हे प्रकरण बँगलोर मधील आहे. जिथे 12 वर्षाच्या मुलीने अनेक जणांना पण खातांना पहिले. कुतुहूल म्हणून तिने देखील ते पान खाल्ले . या मुलीने चवीने ते पान खाल्ले पण काही वेळानंतर तिच्या पोटात दुखायला लागले. 
 
कुटुंबाने मुलीला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टर्सने त्या मुलीच्या पोटाची सोनोग्राफी केली तर रिपोर्ट भीतीदायक आले. रिपोर्टमध्ये कळाले की मुलीच्या पोटात छिद्र झाले आहे. ज्याचे कारण हे लिक्विड नाइट्रोजन पान आहे. पण तिच्या व्यतिरिक्त इतर जणांनी देखील खाल्ल्ले पण सुदैवाने त्यांना कोणतीही समस्या निर्माण झाली नाही. 
 
 डॉक्टर्सने मुलीची सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे. सर्जिकल टीम मुलीच्या पोटाची इंट्रा-ऑप ओजीडी स्कोपी आणि स्लीव गैस्ट्रोक्टोमी टेस्ट केली, ज्यामुळे तिच्या पोटात छिद्र झाल्याचे समजले. आता सर्जरीच्या मदतीने मुलीला वाचवले जाऊ शकते. 
 
नाइट्रोजन एक प्रकारचा गॅस असतो, ज्याला लिक्विड म्हणजे तरल पदार्थ मध्ये बदलवून 20 डिग्री सेल्सियस मद्ये ठेवले जाते. यामुळे  लिक्विड नाइट्रोजनमध्ये जलद गतीने वाफ तयार होते आणि त्यामधून  धूर निघायला लागतो. या लिक्विड नाइट्रोजन गॅसला पानावर टाकले जाते. यामध्ये असलेले केमिकल्स फक्त त्वचेलाच नाही तर आरोग्याला देखील नुकसान करतात. लिक्विड नाइट्रोजनचा धूर घेतल्याने श्वास घ्यायला त्रास होतो.   

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती