पार्लरसारखे पेडीक्योर घरीही करू शकता, या सोप्या स्टेप्स अवलंब करा

गुरूवार, 28 एप्रिल 2022 (08:56 IST)
शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण अनेक गोष्टींचा अवलंब करतो, पण कधी कधी गुडघे, कोपर, पाय यासारखे शरीराचे काही भाग विसरतो. असं म्हणतात की जेव्हाही आपण कोणाच्या समोर जाता तेव्हा समोरच्या व्यक्तीची नजर तुमच्या पायावर पडत असते. अशा स्थितीत जर तुमचे पाय घाण असतील तर समोरच्या वर आपला प्रभाव वाईट पडतो. पाय स्वच्छ असणे खूप महत्वाचे आहे. केवळ सौंदर्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही. अनेकांच्या पायात वारंवार इन्फेक्शन होत असते, तर काही लोकांच्या टाचांना भेगा पडतात. अशा परिस्थितीत आम्ही घरी पेडीक्योर करण्याच्या काही टिप्स सांगत आहोत. चला तर जाणून घेऊया.
 
घरी पेडीक्योर कसे करावे 
 
 1-जुने नेलपॉलिश स्वच्छ करा-पेडीक्योर करण्यासाठी आधी जुने नेलपॉलिश स्वच्छ करा. ते साफ केल्यानंतर, नखांवर फ्रुट क्रीम लावा. 
 
 2-  पाय पाण्यात भिजवा- आता कोमट पाण्यात थोडे एप्सम मीठ मिसळा. आता आपले  पाय कमीत कमी 10 मिनिटे पाण्यात बुडवा. असे केल्याने क्युटिकल्स मऊ होतात. त्यानंतर 10 मिनिटांनी एक पाय बाहेर काढा आणि नंतर पुसून टाका. आता त्यांना क्यूटिकल रिमूव्हरच्या मदतीने स्वच्छ करा.
 
 3- नखे ट्रिम करा आणि फाइल करा-आपले नखे आकार द्या किंवा कट करा. आता पाय फाईलरच्या मदतीने किंवा प्युमिक स्टोनच्या मदतीने टाचा स्वच्छ करा.
 
 4- पायांना हलका मसाज द्या -हे खूप महत्त्वाचं आहे. कोरड्या मॉइश्चरायझरच्या मदतीने पायांना हलका मसाज करा. आपल्या कडे इलेक्ट्रॉनिक फूट मसाजर असल्यास, ते देखील वापरू शकता.  
 
 5- पाय तयार करा- कारण आपण पायाला मसाज केले आहे, आता पायातील ऍक्सेस ऑइल काढण्याची पाळी आहे. यासाठी पाय टॉवेलने स्वच्छ करा किंवा कापसाने स्वच्छ करा.
 
 6- बेस कोट लावा-अनेकदा लोक नेलपॉलिश लावण्यापूर्वी बेस कोट लावणे चुकवतात. पण हे आवश्यक आहे. 
 
 7- नेल पॉलिश लावा-बेस कोट सुकल्यानंतर नेलपॉलिश लावणे आवश्यक आहे. आपला आवडीचा रंग लावा आणि कोरडा होऊ द्या. नंतर दुसरा कोट देखील लावा. 
 
 8- टॉप कोट लावण्याची खात्री करा- टॉप कोटचा पातळ थर आवश्यक आहे. जर आपण अशा लोकांपैकी असाल ज्यांच्या नेलपॉलिश लावल्याबरोबर खराब होतात, तर टॉप कोट लावायला विसरू नका. लक्षात ठेवा, तसेच कोरडे करण्यासाठी वेळ द्या. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती