Health Tips : या लोकांनी बटाट्याचे सेवनकरू नये, आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते

रविवार, 24 जुलै 2022 (11:12 IST)
बटाटा ही अशी भाजी आहे जी सर्वांनाच आवडते आणि ती येथे सर्वात जास्त तयार केली जाणारी भाजी आहे. बटाटा मुख्यतः प्रत्येक भाजीसोबत मिसळून बनवला जातो, कारण बटाटा खायला रुचकर लागतो आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, फॉस्फरस, जस्त आणि लोह यांसारख्या अनेक फायदेशीर पोषक घटक असतात. यासोबतच कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, ग्लुकोज आणि अमिनो अॅसिडचे प्रमाणही आढळते. आयुर्वेद सांगतो की बटाट्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे अनेक समस्या दूर होतात. पण काही समस्यांमध्ये बटाटे खाणे खूप हानिकारक मानले जाते.

बटाटा बहुतेक सगळ्यांनाच आवडतो. याशिवाय बटाट्यामध्ये काही पोषक घटकही आढळतात. परंतु जर आपल्याला आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील तर बटाट्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.चला तर मग जाणून घेऊ या की कोणत्या समस्यांमध्ये बटाट्याचे सेवन करू नये.
 
1 अॅसिडिटी - अॅसिडिटीमध्ये बटाट्याचे सेवन हानिकारक मानले जाते, जर तुम्ही बटाट्याचे नियमित सेवन केले तर त्यामुळे अॅसिडिटीची समस्या आणखी वाढू शकते. याशिवाय बटाटे खाल्ल्याने गॅस तयार होण्याची समस्या देखील उद्भवू शकते, काही लोकांना बटाटे जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटफुगीची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे डॉक्टर अॅसिडिटीमध्ये बटाटे खाण्यास नकार देतात.
 
2 मधुमेह - मधुमेहाच्या रुग्णांनी बटाट्याचे सेवन करणे टाळावे. विशेषतः टाईप 2 मधुमेह किंवा उच्च रक्तातील साखरेचा त्रास असलेल्यांनी बटाट्याचे सेवन करू नये. बटाट्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो आणि त्याच्या सेवनाने शरीरातील रक्तातील साखर म्हणजेच ग्लुकोजचे प्रमाण वाढते. त्यामुळे साखरेची समस्या वाढण्याचा धोका वाढतो. 
 
3 रक्तदाब - रक्तदाबाच्या रुग्णांनी देखील बटाट्याचे सेवन संतुलित प्रमाणात करावे. बटाट्याच्या जास्त सेवन केल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. 
 
4 लठ्ठपणा- ज्यांचे वजन लवकर वाढते त्यांनी बटाट्याचे अजिबात सेवन करू नये, लठ्ठपणाच्या समस्येमध्ये बटाटे खूप हानिकारक असतात, बटाट्यामध्ये भरपूर कार्ब्स असतात, त्यामुळे वजन झपाट्याने वाढते, मग जर आपल्याला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर. बटाट्याचे कमी प्रमाणात सेवन करावे.
 
5 संधिवात- संधिवात आणि संधिरोगाच्या रुग्णांनी बटाट्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे, जर आपण  देखील सांधेदुखीचे रुग्ण असाल तर कमी तेलात आणि साल काढलेले बटाटे खावेत. बटाट्यामुळे संधिवात रोगाचा आजार आणखी वाढू शकतो.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती