काय सांगता, दूध पावडरने त्वचा नितळ आणि मऊ होते

शुक्रवार, 5 मार्च 2021 (09:40 IST)
मुली त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या वस्तुंना वापरतात परंतु त्वचेला पुरेशे पोषण न मिळाल्यामुळे त्वचा निर्जीव आणि कोरडी दिसते. त्वचा देखील मऊ राहत नाही. त्वचेला मऊ आणि नितळ बनविण्यासाठी एखाद्या महागड्या सौंदर्य उत्पादनाच्या ऐवजी आपण दूध पावडर वापरून सुंदर त्वचा मिळवू शकता. हे  नैसर्गिक असण्यासह हे त्वचेला कोणतेही नुकसान न करता पोषण देते. या मुळे स्वच्छ आणि चमकदार त्वचेसह लहान मुलांसारखी त्वचा मिळेल चला तर मग जाणून घेऊ या मिल्क पावडरचा वापर कसा करावा. 
 
* स्क्रब बनवा- 
आपण हे स्क्रब प्रमाणे देखील वापरू शकता. या साठी एका वाटीत 2 मोठे चमचे दूध पावडर आणि 1 लहान चमचा कॉफी पावडर आणि गरजेप्रमाणे नारळाचं तेल मिसळा. नंतर चेहऱ्याला पाण्याने ओले करा. नंतर स्क्रबिंग करा. 5 मिनिटे ठेवा नंतर चेहऱ्याला पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.या मुळे मृतत्वचा स्वच्छ होते. त्वचेवरील अतिरिक्त तेल स्वच्छ होऊन मुरूम,डाग मुक्त होऊन गडद मंडळे कमी होऊन   नितळ आणि चमकदार त्वचा मिळते. 
 
* सिरम म्हणून वापरा- 
आपण याला फेस सिरम बनवून देखील वापरू शकता. या साठी एका वाटीत 1 मोठे चमचे मिल्क पावडर आणि गुलाब पाणी मिसळून पातळ पेस्ट बनवा तयार सिरम कापसाने किंवा हळुवार हाताने चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. एक थर वाळल्यावर दुसरा थर लावा आणि 3 -4 वेळा असं करा. पूर्ण पणे कोरडे झाल्यावर कोमट पाण्याने धुऊन घ्या. या मुळे घाण स्वच्छ होते चेहऱ्यावरील डाग टॅनिग नाहीशी होते. चेहरा उजळतो. निर्जीव आणि कोरडी त्वचेला योग्य पोषण मिळाल्याने चेहरा स्वच्छ, तजेल,नितळ, उजळेल आणि टवटवीत दिसेल.   
 
* फेस मास्क बनवा- 
निरोगी आणि उजळती त्वचे साठी फेसमास्क हे योग्य पर्याय आहे. या साठी आपण एका वाटीत 1 मोठा चमचा मिल्क पावडर, 1 मोठा चमचा हरभराडाळीचे पीठ, चिमूटभर हळद,1 लहान चमचा मध, लिंबाच्या काही थेंबा आणि गरजेप्रमाणे गुलाबपाणी मिसळा. तयार पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावून 20 मिनिटे तसेच ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. या मुळे त्वचेला आतपर्यंत पोषण मिळेल. डाग,काळे गडद मंडळे, मुरूम,ब्लॅक आणि व्हाईट हॅडस दूर होतात. त्वचेवर साचलेली घाण स्वच्छ होऊन त्वचा मऊ,नितळ,तजेल आणि तरुण दिसेल.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती