वॉटरप्रूफ मस्करा ,कसे स्वच्छ करावे ते जाणून घ्या

बुधवार, 26 जानेवारी 2022 (17:21 IST)
पापण्या सुंदर करण्यासाठी मुली मस्करा वापरतात. हे पापण्या मोठ्या आणि जाड करण्यासाठी वापरले जाते. मस्कारा डोळ्यांना सुंदर लुक देतो. जरी बहुतेक मस्करा निघून जातो , तरीही वॉटरप्रूफ मस्करा दिवसभर टिकतात. तो मस्कारा काढणे फार कठीण जाते. जर ते नीट स्वच्छ केले नाही तर ते पापण्यांना नुकसान करू शकतात. त्यामुळे ते कसे स्वच्छ करायचे ते जाणून घ्या.
 
1 डोळ्यांचा मेकअप रिमूव्हर वापरा -वॉटरप्रूफ मस्करा सुरक्षितपणे काढण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. आपल्याला हे फक्त कापसाच्या पॅडवर काही थेंब शिंपडायचे आहेत आणि ह्याने डोळे पुसायचे आहेत.
 
2 खोबरेल तेल - ऑल राउंडर खोबरेल तेल पापण्या वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे आणि याने मस्करा देखील काढू शकता . फक्त कापसाच्या पॅडवर थोडेसे घ्या आणि आपल्या पापण्यांवर लावा. 
 
3 ऑलिव तेल- ऑलिव्ह ऑइल हा सर्वात सोपा मार्ग आहे. फक्त आपल्या बोटांनी  थोडे ऑलिव्ह तेल पापण्यांवर लावा. नंतर तो पुसण्यासाठी कापसाचा गोळा वापरा.
 
4 कोल्ड क्रीम - त्वचा मऊ करणारे कोल्ड क्रीम हे आपल्या पापण्यांमधून मस्करा काढून टाकण्याचा आणखी एक चांगला मार्ग आहे. आपला मस्करा काढून टाकण्यासाठी, डीप कंडिशनिंग ट्रीटमेंट म्हणून आपल्या त्वचेवर आणि पापण्यांवर कोल्ड क्रीम लावा. काही मिनिटांनंतर उबदार कापडाने स्वच्छ करा. 
 
5 बेबी शैम्पू - बेबी शैम्पू हायपोअलर्जेनिक असतात,हे आपल्या डोळ्यांसाठी सुरक्षित असतात. शिवाय,आपल्या पापण्यांमधून वॉटरप्रूफ मस्करा काढण्याचा हा खरोखर सोपा मार्ग आहे. आपल्याला फक्त थोडेसे बेबी शैम्पू घ्यायचे आहे आणि ते ओलसर कॉटन पॅडने आपल्या पापण्या स्वच्छ करण्यासाठी वापरायचे आहे. नंतर चेहरा धुवा. मात्र, ह्याचा नियमित वापर करायचा नाही ही काळजी घ्या. याचे कारण असे की बेबी शैम्पू संवेदनशील भागांना जळजळ होऊ  देऊ नये म्हणून डिझाइन केलेले आहे, परंतु दररोज शैम्पू वापरणे हानिकारक असू शकते.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती