त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी अशा प्रकारे निवडुंग वापरा

बुधवार, 30 मार्च 2022 (15:29 IST)
निवडुंग ज्याला आपण केक्ट्स म्हणून ओळखतो हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. याचे फायदे जाणून घेतल्यावर आपण याचा वापर कराल. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 टॅनिंग काढा उन्हाळ्यात त्वचेचे टॅनिंग होणे सामान्य आहे. पण हे टॅनिंग दूर करण्यासाठी निवडुंग मदत करू शकते. आपल्या त्वचेवर फक्त कॅक्टस जेल किंवा रस लावा. त्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात जे त्वचेला हायड्रेट करतात आणि अँटिऑक्सिडंट्स जे त्वचेला यूव्ही किरणांपासून वाचवतात. एवढेच नाही तर त्याचे जेल त्वचेवर लावल्यास त्वचेचे टॅनिंग कमी होण्यासही मदत होते.
 
2 पिंपल्सपासून मुक्ती-  उन्हाळ्यात ब्रेकआउट्स आणि एक्ने ची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत, निवडुंग वापरणे चांगला पर्याय असू शकतो. वास्तविक, कॅक्टस ऑइलमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, जे बॅक्टेरियामुळे होणाऱ्या एक्ने पासून आराम देतात. बाजारात कॅक्टसचे तेल सहज मिळेल. या तेलाचे काही थेंब घेऊन त्वचेवर लावायचे आहेत. काही दिवसात  परिणाम दिसू लागेल.
 
3 त्वचा तरुण बनवा-  जर आपण त्वचेपासून वृद्धत्वाची चिन्हे दूर ठेवायची असतील, तर निवडुंगला आपल्या स्किन केयर रुटीनचा एक भाग बनवा. यासाठी आपल्याला फक्त कॅक्टस बियाणांचे तेल एका वाटीत घेऊन त्यात स्वच्छ कॉटन पॅड बुडवून चेहऱ्यावर लावायचे आहे. निवडुंगात आढळणारे अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आपली त्वचा दीर्घकाळ तरूण ठेवण्यास मदत करतात.
 
4 कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर-  कॅक्टस ऑइल मुळे कोरड्या त्वचेलाही फायदा होतो. ते वापरण्यासाठी, आपण फक्त एक निवडुंग कापून घ्या. तथापि, या दरम्यान थोडी काळजी घ्या कारण त्यात काटे असतात. आता त्याचे जेल काढा आणि त्वचेवर लावा. यामुळे त्वचेला अतिरिक्त ओलावा मिळेल आणि कोरड्या त्वचेच्या समस्यांपासूनही सुटका मिळेल.
 
5 निस्तेज त्वचेची समस्या दूर होईल-  जर आपल्याला निस्तेज त्वचेमुळे त्रास होत असेल तर आपण चेहऱ्यावर कॅक्टस फेस मास्क लावा. हा मास्क तयार करण्यासाठी, एका भांड्यात फक्त एक चमचा कॅक्टस जेल, एक चमचा मध, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा कोरफडीचा गर घ्या. ते चांगले मिसळा आणि आपला चेहरा स्वच्छ करून त्यावर हा मास्क लावा आणि 10-15 मिनिटे तसेच ठेवा. शेवटी, नंतर चेहरा धुवून घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती