आपल्या सर्वांना माहित आहे की भोपळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण, खूप कमी लोकांना माहित आहे की भोपळ्याचा फेस पॅक देखील आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे चेहऱ्यावर चमक आणण्यास मदत करते. आज आम्ही तुम्हाला भोपळ्याचे असे काही घरगुती पॅक सांगणार आहोत, जे तुम्ही सहज बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया हे फेस पॅक कसे बनवायचे-
डेड आणि ड्राय स्किनसाठी
जर तुमच्या त्वचा ड्राय असेल तर तुम्ही भोपळा बारीक करून पेस्ट तयार करू शकता. नंतर या पेस्टचे 2 चमचे घ्या आणि त्यात 1 चमचा मिल्क क्रीम आणि 4 चमचे साखर मिसळून मिश्रण तयार करा. ही पेस्ट 15 ते 20 मिनिटांसाठी त्वचेवर लावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. तुमच्या त्वचेच्या सर्व डेड पेशी निघण्यास मदत होईल आणि त्वचा सॉफ्ट दिसेल. ब्लॅकहेड्सच्या समस्येपासूनही तुम्हाला सुटका मिळेल.
सेंसिटिव स्किनसाठी
संवेदनशील त्वचेवर काहीही वापरण्यापूर्वी आपल्याला अनेक वेळा विचार करावा लागतो. भोपळ्याचा फेस पॅक बनवण्यासाठी आधी भोपळा बारीक करून पेस्ट तयार करा. यानंतर, त्यात 1 चमचा मध, एक चमचा दालचिनी पावडर आणि एक चमचा दूध मिसळून पेस्ट तयार करा. ते चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे सोडा. नंतर ते थंड पाण्याने स्वच्छ करा.
ऑयली स्किनसाठी
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही यासाठी भोपळयाचा फेस पॅक वापरा. हा फेस पॅक बनवण्यासाठी आधी भोपळ्याची पेस्ट घ्या आणि त्यात सफरचंद सायडर व्हिनेगर आणि एक चमचा साखर घाला. आता ते चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटे सोडा. नंतर ते स्क्रब करून काढून टाका. नंतर थंड पाण्याने धुवा. तुमच्या चेहऱ्यावर काही दिवसांत चमक दिसू लागेल.