Home Remedies: : पोटावरील आणि मांड्यांवरील स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी उपाय

शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (15:29 IST)
पोटावरील पांढरे स्ट्रेच मार्क्स काढण्यासाठी टिप्स : जास्त लठ्ठपणा, गर्भधारणा किंवा मासिक पाळी दरम्यान शरीरावर स्ट्रेच मार्क्स होतात. वास्तविक, आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारच्या चढउतारांमुळे शरीरावर स्ट्रेच मार्क्स तयार होऊ लागतात. जरी हे  कोणत्याही प्रकारच्या रोगाचे किंवा शारीरिक समस्येचे लक्षण नसले, तरी बऱ्याच लोकांना ते पाहणे वाईट वाटते.हे मार्क्स लपवण्यासाठी त्यांना लांब कपड्यांचा सहारा घ्यावा लागतो. आपल्याला ही अशीच समस्या असल्यास, स्ट्रेच मार्क्सपासून मुक्त होण्यासाठी या घरगुती उपायांचा अवलंब करा.
 
स्ट्रेच मार्क्स काढून टाकण्यासाठी सोपे घरगुती उपाय
 
1   व्हॅपोरब -सर्दी झाल्यावर अनेकदा लोक व्हेपोरब वापरतात. पण फार कमी लोकांना माहित आहे की त्याचा वापर स्ट्रेच मार्क्स काढण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. यासाठी मार्कवर व्हेपोरब लावा आणि नंतर ती जागा क्लिंग रॅपच्या मदतीने झाकून ठेवा. रात्रभर असेच राहू द्या. आपण दररोज रात्री हा उपाय केलात तर आपल्याला काही दिवसातच फरक दिसू लागेल. 
 
2 लिंबाचा रस-एका वाडग्यात लिंबाचा रस काढा आणि आपल्या स्ट्रेच मार्क्सच्या क्षेत्रावर वर्तुळाकार  दिशेने लावा. ते दहा मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
 
3 बदामाचे तेल-जर शरीराच्या कोणत्याही भागाच्या त्वचेवर स्ट्रेच मार्क्स तयार झाले असतील तर आपण आपल्या आवडीचे कोणतेही तेल घेऊ शकता आणि त्यात एक ते दोन चमचे बदाम तेल मिसळू शकता. आता हे तेल हलके गरम करा आणि ते स्ट्रेच मार्क्स क्षेत्रावर लावा. आपल्याला हे तेल वर्तुळाकार दिशेने लावावे लागेल. ते कोरडे होईपर्यंत चोळत राहा. हा उपाय दिवसातून दोनदा करा.
 
4 हरभराडाळीचे पीठ आणि काकडीचा रस- स्ट्रेच मार्क्सपासून मुक्त होण्यासाठी एका भांड्यात बेसन किंवा हरभराडाळीचे पीठ घ्या आणि त्यात एक चमचा काकडीचा रस मिसळून पेस्ट बनवा.आता ही पेस्ट स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि 10 मिनिटे सुकू द्या. नंतर कोमट पाण्याने धुवून घ्या.
 
टीप- हे वापरण्यापूर्वी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती