लांब आणि दाट केसांची इच्छा बाळगता, हे नैसर्गिक उपाय करा

सोमवार, 11 जानेवारी 2021 (10:29 IST)
प्रत्येक मुली प्रमाणे आपण देखील काळे आणि लांब केसांची इच्छा बाळगता? बऱ्याच उपाय अवलंब केल्यावर देखील इच्छित परिणाम मिळत नाही ? तर काळजी नसावी. आम्ही सांगत आहोत घनदाट आणि काळेभोर केस करण्याचे नैसर्गिक उपायांबद्दल. 

तज्ज्ञ सांगतात की केस दरमहा सरासरी अर्ध्या इंचाने वाढतात, ज्या मुळे एखाद्या माणसाच्या केसांची वार्षिक वाढ 6 इंच वाढते. पण सध्याच्या प्रदूषित वातावरण आणि खराब खाण्या-पिण्यामुळे, आता कदाचितच कोणी या पातळीवर पोहोचेल. तरी ही आपले केसांचे आरोग्य आणि लांबी राखण्यासाठी सर्वोपरीने प्रयत्न केले पाहिजे. चला तर मग काही हेयर टिप्स जाणून घेण्यासाठी आणि अवलंबविण्यासाठी सज्ज व्हा.
 
* केसांना नियमानं ट्रिम करा- 
आपल्या केसांना दर आठ ते दहा आठवड्याने ट्रिम करा कारण हे खराब झालेले केसांना काढून टाकतात आणि दोन तोंडी झालेल्या केसांच्या समस्येपासून मुक्त करतात. असं केल्यानं केसांना नैसर्गिकरीत्या कोणत्याही अडथळ्याशिवाय वाढण्यात मदत मिळते. ही टीप आपल्याला जलद आणि समाधानकारक परिणाम देते.
 
* केसांमध्ये कॅफिन वापरा-
होय! आपण खरेच ऐकले आहे की केसांसाठी कॅफिन एक चांगला घटक आहे. जेव्हा गोष्ट येते आरोग्याची तर ही आपल्या स्कॅल्प मध्ये रक्तपरिसंचरण उत्तेजित करतो आणि केसांच्या गळतीसाठी जबाबदार हार्मोन DHT चा प्रतिकार देखील करतो. म्हणून आपल्या दिनचर्येत कॅफिन युक्त उत्पादकांचा वापर केल्याने आपल्या केसांसाठी चमत्कारिक असेल.
 
* हेयर मास्क आणि नियमितपणे तेल लावणे -
हेयर मास्क सर्व पोषक घटक आणि खनिजाचे समृद्ध असल्यामुळे केसांसाठी चांगले मानले जाते. जरी सर्व आवश्यक वस्तूंनी भरलेले ब्रँडेड हेयर मास्क वापरणे कधी-कधी चांगले आहे.पण घरात बनलेला हेयर मास्क देखील चांगला असतो. या शिवाय केसांवर नियमितपणे तेल लावणे देखील आवश्यक आहे. या साठी स्कॅल्प आणि केसांमध्ये रात्री तेल लावून सकाळी शॅम्पूने धुऊन घ्या चांगले परिणाम मिळविण्यासाठी हेयर मास्क लावून 30 ते 45 मिनिटानंतर धुऊन घ्या.
 
* केसांना गरम पाण्याने धुणे टाळा- 
आपल्यातील बहुतेक जण केसांना धुण्यासाठी गरम पाणी वापरतात. विशेषतः हिवाळ्यामध्ये. परंतु अभ्यासाने कळाले आहे की गरम पाण्याने धुतल्यामुळे छिद्राचे नुकसान झाल्यामुळे केसांची वाढ खुंटते. म्हणून केसांना आणि स्कॅल्प ला वाचविण्यासाठी केसांना धुताना थंड किंवा कोमट पाण्याच्या वापर करावा. 
 
* कंडीशनींग -
आपल्या केसांना चमकदार, निरोगी आणि लांब ठेवण्याच्या सर्वात सोप्या पद्धतीमधील एक आहे की प्रत्येक वेळा केस धुतल्यानंतर कंडिशनर लावायचे आहे. ही केसांना गुंतागुंती पासून रोखत आणि केसांना मऊ बनवतं. या मुळे केसांची गळती कमी होते. कंडीशनींग केसांना सील करण्यात देखील मदत करते आणि केसांना नुकसानापासून वाचवते. केसांची वाढ जरी हळू आणि कंटाळवाणी प्रक्रिया आहे  तरी काळजी करू नये. निरोगी आहारासह केसांच्या जलद वाढीसाठीच्या या टिप्स अवलंबवून आपण केसांमध्ये बदल करू शकता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती