उन्हाळ्यात टाचांना तडे जात आहे, अवलंबवा हे घरगुती उपाय

बुधवार, 15 मे 2024 (07:00 IST)
उन्हाळा आला की उष्णतेचे परिणाम त्वचेवर व्हायला लागतात. याकरिता आपल्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. उन्हाळयात उष्णतेने पायांची त्वचा देखील प्रभावित होते. तसेच तळपायांची त्वचा ही फाटायला लागते म्हणजे टाचांना तडे जातात. या समस्येपासून आराम मिळण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकतात. चला तर जाणून घेऊ या कोणते आहे घरगुती उपाय 
 
1. टाचांना तडे गेल्यास थोड्याप्रमाणात दूध घेऊन त्यामध्ये मध मिक्स करा. व हे मिश्रण टाचांवर लावावे. मधामध्ये अँटीबॅक्टिरियल तत्व असतात. जे इन्फेक्शना थांबवते. दूध त्वचेची खोलवर क्लिंजिंग करते व त्वचा मऊ बनवते. रात्री झोपण्यापूर्वी आपल्या पायांना मध आणि दुधाचे मिश्रण लावावे तसेच दुसऱ्या दिवशी पाण्याने स्वछ धुवून घ्यावे. 
 
2. टाचेच्या कोरड्या त्वचेला मऊ बनवण्यासाठी शुद्ध तूप देखील फायदेशीर असते. तूप हे नैसर्गिक मॉइस्चराइझरचे काम करते. तसेच त्वचेला पोषण देते. टाचांना मऊ बनवण्यासाठी तुपाने मसाज करावा. रात्री झोपण्यापूर्वी पायांना साबण आणि कोमट पाण्याने धुवावे. आता कोमट शुद्ध तुपाने टाचांची मॉलिश करावी. तसेच रात्र भर पायांना लावून ठेवावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती