घरगुती पद्धतीने चेहर्‍यावर घ्या वाफ, स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळवा

स्वस्थ आणि सुंदर राहणे कोणाला आवडण नाही परंतू औषध आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्याने अनेकदा साइड इफेक्ट्सला सामोरा जावं लागतं. अशात घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. आज आम्ही आपल्याला सांगत आहोत वाफ घेण्याचे फायदे. घरात काळजीपूर्वक स्टिम घेतल्याने खर्च देखील वाचतो आणि त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.
 
1 वाफ घेतल्याने ताण कमी होतो. तसेच वाफ घेतल्याने चेहर्‍यावरील त्वचेच्या रक्त परिसंचरणात सुधार होतो. याने त्वचा रक्त वाहिनींना पसरण्यात मदत मिळते आणि पेशींमध्ये रक्त प्रवाह वाढतो. अशाने त्वचेला पोषक तत्व आणि ऑक्सीजन अधिक प्रमाणात मिळतं आणि त्वचा तरुण दिसू लागते.
 
2 त्वचेवरील डेड स्कीन स्वच्छ करण्यासाठी आणि नैसर्गिक रीत्या त्वचा चमकदार व्हावी यासाठी वाफ घेणे एक योग्य उपाय आहे. याने कोणतेही ब्युटी प्रोडक्ट्स न वापरता आपण ग्लोइंग स्किन मिळवू शकता.
 
3. चेहर्‍यावर वाफ घेतल्याने त्वचेत आढळणारे टॉक्सिन हटण्यास मदत मिळते. केवळ चेहर्‍यावरील वाफाने देखील शरीरात विषाक्त पदार्थांपासून मुक्ती मिळू शकते.
 
4 चेहर्‍यावरील मृत त्वचा हटवण्यासाठी आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी वाफ घ्यावी. याने त्वचा ताजीतवानी दिसते आणि त्वचेवरील ओलावादेखील कायम राहण्यास मदत मिळते. ड्राय स्कीन असणार्‍यांसाठी वाफ घेणे फायदेशीर ठरेल.
 
5 चेहर्‍यावर मुरुम असल्यास वाफ घेतल्याने छिद्रांमध्ये जमा असलेली घाण, बॅक्टेरिया सहज बाहेर निघतात आणि त्चवा स्वच्छ दिसू लागते.
 
कशा प्रकारे घ्यावी वाफ
सर्वात आधी सुविधापूर्ण जागेची निवड करा. 
यासाठी टेबल योग्य पर्याय आहे. 
यासाठी आपल्याला एका टॉवेलची गरज असेल. 
वाफ घेण्यापूर्वी आ‍पले केस बांधून घ्यावे. 
वाफ घेण्यापूर्वी चेहरा आणि मान स्वच्छ करुन घ्यावी. 
नंतर एका भांड्यात 4-5 ग्लास पाणी उकळून घ्या. 
गॅस वर वाफ घेण्याची चूक करु नका. 
भांड्यापासून 6 ते 8 इंच लांबीवर चेहरा ठेवा. 
डोक्यावरुन टॉवेल घ्या आणि गरम वाफ चेहर्‍यावर येऊ द्या. 
आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपण यात तेलाचे काही थेंब मिसळू शकता. 
आपल्या अधिक गरम जाणवत असल्यास आपलं डोक वर करा आणि टॉवेलची एक बाजू मोकळी करा. 
अशा प्रकारे प्रत्येक 2 मिनिटाच्या अंतराळाने वाफ घ्या. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती