काळपटपणा दूर करून चेहर्याला नवतजेला मिळवून देण्यासाठी महिला ब्लीच करून घेतात. बाहेरच्या ब्लीचमध्ये बरेच रासायनिक घटक असतात. त्यामुळे ब्लीच केल्यानंतर अनेकींना चेहर्यावर पुरळ उठणं, त्वचा लाल होणं अशा समस्यांना सामोरं जावं लागलं. त्यातही संवेदनशील त्वचा असणार्या महिलांना याचा खूपच त्रास होतो. वारंवार ब्लीच केल्याने त्वचेच्या मूळ रंगावर परिणाम होतो. चेहर्यावरची बारीक लव पांढरट दिसू लागते. इतकंच नाही तर आपला वर्णही पांढरट दिसू लागतो. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी तसंच ब्लीचचा परिणाम साधण्यासाठी काही नैसर्गिक उपाय करता येतील. त्याविषयी...