झोपण्यापूर्वी या सौंदर्य टिप्स अवलंबवा त्वचा नेहमी उजळेल

मंगळवार, 8 जून 2021 (08:30 IST)
झोपेच्या पूर्वी थकवा आल्यामुळे बरेच लोक आपल्या त्वचेसाठी काहीही करण्यास असमर्थ असतात परंतु जर ही सवय थोडी बदलली तर बरेच काही फायद्याचे ठरू शकते.या साठी या 5 टिप्स अवलंबवा जेणे करून आपली त्वचा उजळेल.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 चेहरा पाण्याने धुवा-रात्री झोपण्यापूर्वी चेहरा पाण्याने धुवावा. जेणे करून त्वचेवरील घाण स्वच्छ होईल आणि त्वचा उजळेल.
 
2 हर्बल फेसक मास्क वापरा- रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला निरोगी आणि पोषण मिळण्यासाठी हर्बल फेस मास्क वापरा या साठी आपण उन्हाळ्यात काकडी,मुल्तानीमाती किंवा चंदन पावडरचे फेसपॅक बनवून लावू शकता.
 
3 डोळ्यांची विशेष काळजी घ्या- रात्री झोण्यापूर्वी आपण डोळ्यांवर मलाई किंवा आयड्रॉप घालणे विसरू नका.डोळे हे फारच नाजूक असतात म्हणून ह्याची काळजी घेणे गरजेचे आहे. डोळ्यांच्या सभोवताली काळे गडद मंडळे असल्यास रात्री झोपेच्या पूर्वी मलई लावायला विसरू नका.
 
4 त्वचेला मॉइश्चराइझ करणे विसरू नका-आपण त्वचेला मॉइश्चराइझ करण्यासाठी क्रीम,लोशन, किंवा नारळाचं तेल लावू शकता. हे लावल्याने त्वचेमध्ये ओलावा राहील आणि अकाली सुरकुत्या येणार नाही.
 
5 केसांची मॉलिश करा- त्वचेसह आपण केसांची मॉलिश देखील करू शकता.या मुळे केसांना देखील पोषण मिळेल.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती