* सध्या चेहर्यावर मास्क असल्यामुळे डोळ्यांच्या मेकअपवर भर असतो. तुम्हालाही खास प्रसंगासाठी हेवी आय मेक अप करायचा असेल तर सगळं काही योग्य पद्धतीने सेट व्हायला हवं. चेहर्यालचा मेकअप करण्यासाठी फाउंडेशन, बीबी क्रीमचा बेस आवश्यक असतो. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या मेकअपसाठीही बेस लागतो. तुम्ही प्रायमर किंवा फाउंडेशनचा वापर करून हा बेसदेऊ शकता. यामुळेकाजळ डोळ्यांलगत बराच काळ टिकून राहील.