कफ वाढल्याने 28 आजार होतात, या 5 गोष्टी खाऊ नका

सोमवार, 24 मे 2021 (17:27 IST)
वात आणि पित्तासह शरीरातील कफाचे संतुलन असणे महत्त्वाचे आहे. कफ वाढल्यामुळे आपल्याला 28 प्रकारचे आजार होऊ शकतात. या पासून वाचण्यासाठी आपल्याला अशा गोष्टींना त्यागावे लागतील ज्या कफ वाढवतात. किंवा कफ तयार करतात. चला जाणून घेऊ या अशा कोणत्या गोष्टी आहे ज्या कफ असल्यास खाऊ नये. 
 
1 फॅटी वस्तू -चरबीयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने हे कफ वाढविण्याचे काम करतात, म्हणून शक्य तितक्या चरबीयुक्त वस्तू टाळण्याचा प्रयत्न करा.
 
2 दूध - दुधामुळे कफ वाढतो. जर आपली प्रकृती कफाची आहे तर आपण दुधाचे सेवन कमी करावे किंवा हळदीसह दूध घ्यावे.
 
3 मांस - कफ वाढल्यावर मांसाचे सेवन करणे आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते, म्हणून कफ असल्यास मांस खाणे टाळा व कफ प्रकृती असल्यास मांसाचे सेवन कमी करा.
 
4 लोणी -लोणी मध्ये चरबी जास्त असते, लोणी  कफ वाढविण्याचे काम करत. कफ असल्यास लोणी किंवा लोणीयुक्त पदार्थांचे सेवन करू नका.
 
5 पनीर- पनीर ने कफ तयार होतो, तसेच बऱ्याच लोकांना पाचन संबंधी त्रास देखील उद्भवू शकतात. कारण पनीर हे सहज पचत नाही. 
म्हणून पनीरचे अति सेवन करणे टाळा.
 
काय खावे- 
 
1 सकाळी किंवा दिवसाच्या जेवणांनंतर गुळाचे सेवन करणे फायदेशीर आहे. गुळाची प्रकृती उष्ण असते, हे कफाला कमी करण्यासह पाचन क्रिया देखील सुधारतो. 
 
2 तुळस,सुंठ,आलं आणि मध या सारख्या गोष्टी खाल्ल्याने कफ कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या गोष्टी कोणत्याही प्रकारे आपल्या आहारात समाविष्ट करा.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती