मेथीदाण्याचे 5 फायदे

रविवार, 23 मे 2021 (18:53 IST)
अन्नाची चव वाढविण्यासाठी मेथीदाण्याचा वापर केला जातो. परंतु आरोग्य आणि  सौंदर्य लाभ देखील या मुळे मिळतात. चला याचे फायदे जाणून घेऊ या.
 
1 मेथीदाण्याची पूड दररोज खाल्ल्याने वजन नियंत्रित होते. चरबीचे प्रमाण कमी होते.अशा  प्रकारे आपण आपले वजन देखील कमी करू शकता.
 
2 मेथीदाण्याचे नियमित सेवन केल्याने हृदयरोग दूर राहण्यास मदत होते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि आपण आपले हृदय निरोगी ठेवू शकता.
 
3 मधुमेहाच्या रुग्णांसाठी मेथीदाणा  खूप फायदेशीर आहे. दररोज रात्री भिजवल्यानंतर, सकाळी ते चावून खाल्ल्याने फायदे मिळतात.
 
4 केसांच्या सौंदर्यासाठीही मेथिदाना फायदेशीर आहे. त्याची पेस्ट केसांवर लावल्याने केसांचा रुक्षपणा नाहीसा होतो, तसेच केस अधिक मजबूत होतात.
 
5 चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यातही हे मेथीदाणा काही कमी नाही. ते वाटून चेहऱ्यावर लावल्याने  त्वचा चमकते. याशिवाय कोरड्या त्वचेसाठी हे खूप फायदेशीर आहे, कारण यामुळे त्वचेला ओलावा मिळतो.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती