सुंदर आणि घनदाट लांब केस असणे प्रत्येक महिलेची आवड असते. परंतु सध्याच्या प्रदूषणांमुळे आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, बदलत्या जीवनशैली मुळे केस पातळ होत आहे. केसांना निरोगी ठेवण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरातील काही गोष्टींचा वापर करून पातळ केस घनदाट करू शकता. हे पूर्णपणे नैसर्गिक असल्याने काही नुकसान होणार नाही.हे निरोगी केसांना वाढवते. यासाठी आपण मेथीदाण्याचे तेल बनवून ते लावून केसांना घनदाट करू शकता . मेथीदाण्याचे तेल पूर्णपणे नैसर्गिक असून पातळ केसांना घनदाट करत.
या साठी लागणारे साहित्य -मेथीदाणे 2 मोठे चमचे, एरंडेल तेल 1/2 कप
कृती - मेथीदाण्याचे बियाणे वाळवून घ्या आणि वाटून पूड बनवून घ्या. ही पूड तेलासह मिसळून दोन ते तीन आठवडे कडक उन्हात ठेवा. आपण एरंडेल तेला ऐवजी नारळ तेल आणि ऑलिव्ह तेल देखील वापरू शकता.
मेथीदाणे लावण्याचे फायदे-
केसांचे मूळ मजबूत होतात. खराब केसांची दुरुस्ती करतात. हे नैसर्गिक तेल केसांची चमक कायम ठेवतात आणि केसांना सुंदर बनवतात.
मेथीदाण्यात केसांच्या वाढीसाठी उच्च प्रथिने आणि निकोटीन ऍसिड असत. तसेच मेथीदाण्यात हार्मोन ऍंटीसिड असतात जे केसांना पातळ होण्यापासून आणि टक्कल पडण्यापासून वाचवतात.केस घनदाट करतात.या मध्ये फॉलिक ऍसिड देखील मुबलक प्रमाणात आढळते या शिवाय या मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी,पोटॅशियम,कॅल्शियम,आयरन सारखे खनिजे असतात.हे सर्व घटक केसांना नवीन आयुष्य देत.