केस पांढरे होत आहे, आहारात हे समाविष्ट करा

गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (10:15 IST)
केस पांढरे होण्याची समस्येमुळे आज प्रत्येक जण वैतागला आहे. प्रत्येक जण आपापल्यापरीने काही न काही उपाय करत आहेत. तज्ज्ञ सांगतात की केस व्हिटॅमिन बी 12 ,आयोडीन आणि झिंक सारख्या पोषक घटकांच्या कमतरतेमुळे पांढरे होतात. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी योग्य आहार घेण्याची गरज आहे. आपल्या आहारात हे पदार्थ समाविष्ट करा आणि केसांना पांढरे होण्यापासून वाचवा. 
 
1 पालक -
पालक एक हिरवी पालेदार भाजी आहे. हे आयरनाचे चांगले स्रोत आहे. या मध्ये आयरना शिवाय मुबलक प्रमाणात फॉलिक ऍसिड आढळते, जे केसांना पांढरे होण्यापासून रोखतात.
 
2 कढीपत्ता -
कढीपत्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या मध्ये आयरन आणि फॉलिक ऍसिड मुबलक प्रमाणात आढळते. ह्याला आपल्या आहारात समाविष्ट करून केसांना पांढरे होण्यापासून वाचवू शकतो.
 
3 ब्लूबेरी -
ही खाण्यात जेवढी चविष्ट नसते परंतु आरोग्यासाठी चांगली मानली जाते. केसांना पांढरे करणारे व्हिटामिन बी 12 ,आयोडीन आणि झिंक च्या कमतरतेला ब्लूबेरीच्या सेवनाने दूर केले जाऊ शकते. 
 
4 ब्रोकोली -
ह्याला हिरवा कोबी म्हणून देखील ओळखतात. हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले आहे. या मध्ये असलेले फॉलिक ऍसिड केसांना अकाळी पांढरे होण्यापासून वाचवतात.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती