ड्रायर आणि केसांची निगा

शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2015 (00:39 IST)
केसांची काळजी हा समस्त महिलावर्गाचा विशेष काळजीचा प्रांत. या विषयावर त्यांची अव्याहत चर्चा सुरू असतेच. त्यामुळे केसांच्या बाबतीत मिळणारी प्रत्येक टिप अनेकजणी गांभिर्याने घेतात. 
 
रोज धुल्याने केस पांढरे होतात असा एक प्रवाद आढळतो. मात्र याला शास्त्रीय आधार नाही. रोज धुतल्यास नैसर्गिक तेल कमी होऊन केस रुक्ष होऊ शकतात. मात्र त्यामुळे ते पांढरे होत नाहीत. ड्रायरच्या वापरानेही केस पांढरे होत नाहीत. 
 
ड्रायरमधून बाहेर पडणार्‍या अतीगरम हवेमुळे केस कोरडे होतात आणि गळू लागतात. पण ते पांढरे होत नाहीत. 

वेबदुनिया वर वाचा