Numerology Prediction 2020 मूलांक 6 साठी अंक ज्योतिष

Webdunia
शनिवार, 21 डिसेंबर 2019 (13:40 IST)
मूलांक ६ चा स्वामी ग्रह शुक्र आहे. म्हणूनच या मूलकांच्या लोकांना चैनीची आवड असते. तथापि या वर्षी आपण देखाव्यापासून दूर मूळभूत आवश्यकतांकडे लक्ष द्याल. 
 
या वर्षी आपण कुटुंबाजवळ राहणे पसंत कराल. आपणास परिवाराची गरज असेल. कौटुंबिक सदस्य आपणास मदत करतील. जेणे करून आपण यश मिळवाल. कौटुंबिक खर्च वाढेल. ह्या वर्षी अनपेक्षित खर्चाचे प्रमाण जास्त राहील. यावर नियंत्रण ठेवण्याची गरज असेल. अन्यथा आर्थिक समस्यांना सामोरा जावं लागू शकतं. 
 
या मूलकांच्या लोकांसाठी हे वर्ष चांगले असणार. ह्या वर्षी कॅरिअरच्या क्षेत्रात आपण यशस्वी होणार. आपणास कामाच्या ठिकाणी राजकारणापासून लांब राहण्याचा सल्ला दिला जात आहे. सहकाऱ्यांशी सलोख्याने वागा. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुसंगतीने वागा. महिलांना आदराने वागवा. एखाद्या महिला मित्राच्या साहाय्याने आपणास यश मिळेल.

संबंधित माहिती

पुढील लेख