Money Horoscope आर्थिक राशिभविष्य: कर्क

Webdunia
शनिवार, 21 डिसेंबर 2019 (11:26 IST)
ह्या राशीच्या जातकांसाठी हे वर्ष मिश्रीत फळ देणारे आहे. वर्षाच्या सुरुवातीस आर्थिक संघर्ष होऊ शकतो आणि खर्चात वाढ देखील दिसून येते. जानेवारी ते मार्च आणि जुलै ते नोव्हेंबरची कालावधीत आर्थिक लाभ होतील. आपणास पैशांची प्राप्ती होईल जेणे करून आपण भविष्य संबंधी निर्णय घ्याल जे आपणास पुढे फायदेशीर ठरतील.
 
आपल्याला काही काळ आर्थिक चढ उताराला सामोरा जावं लागेल. अचानक खर्च संभवतो त्यामुळे आर्थिक चणचण जाणवेल. म्हणूनच, पैशाच्या व्यवहार आणि गुंतवणुकीचा आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. उधारी उसनवारी देऊ नका. तोटा संभवतो. घरगुती समारंभात खर्च होईल. आर्थिक नियोजन वेळीच करा. कुठलाही आर्थिक व्यवहार कटाक्षाने टाळा. 

संबंधित माहिती

पुढील लेख